आमच्याबद्दल

सेंद्रिय उत्पादनांचेसुलभ विपणन

कृषी मंत्रालय, कृषी विभाग हे एमएसटीसी समवेत जैविक खेती पोर्टलव्दारेआंतरराष्ट्रीय स्तरावर सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी अनोखा उपक्रम राबवित आहे. या पोर्टलव्दारे शेतकऱ्यांना त्यांची सेंद्रिय उत्पादने आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा किफायतशिर दराने विक्री करण्यासाठी मदत होणार आहे.

1

2

जैविक खेती पोर्टल इ-व्यापाराचेतसेच माहितीचे व्यासपीठ आहे. या विभागात सेंद्रिय शेतीस प्रोत्साहन देण्यासाठी केस स्टडीज, व्हिडिओ, सर्वोत्कृष्ट शेती पद्धती, यशोगाथा आणि सेंद्रिय शेतीशी संबंधित इतर माहितीचा समावेश आहे. पोर्टलच्या ई-वाणिज्य विभागामध्ये धान्य, कडधान्य, फळे आणि भाजीपाला यांच्या सेंद्रिय उत्पादनांची संपूर्ण माहिती आहे.

पोर्टलच्या माध्यमातून आता खरेदीदार अगदी कमी किंमतीत सेंद्रिय उत्पादने खरेदी करु शकतात. शेतकऱ्यांना त्यांची उत्कृष्ट सेंद्रिय उत्पादने बाजाराच्या तुलनेत अत्यंत कमी दरात थेट ग्राहकांना घरपोच करुन देता येतील.

3

4

सेंद्रिय शेतीच्या सर्वांगीण विकासासाठी हे पोर्टलविभागीय परिषद, शेतकरी गट, वैयक्तिक शेतकरी, खरेदीदार, शासकीय संस्था आणि निविष्ठा पुरवठादार यासारख्या विविध भागधारकांना जोडले आहे.

या पोर्टलच्या माध्यमातून फॉरवर्ड लिलाव, प्राईस-क्वांटिटी, बुक बिल्डिंग व रिव्हर्स लिलाव प्रक्रियेद्वारे आम्ही शेतकऱ्यांच्या उत्पादनाला सर्वोतम किंमत मिळविण्यास हातभार लावत आहोत.

5

आमच्या सुविधा
खरेदीदार नोंदणी

खरेदीदार लॉगइनशिवाय उत्पादने निवडू शकतात, तथापि निवडलेले उत्पादन खरेदी करतांना खरेदीदार यांना पोर्टलमध्ये नोंदणी करणे किंवा लॉगइन करणे आवश्यक आहे.

विक्रेत्यांची नोंदणी

पोर्टलवर शेतकरी स्वतःची नोंदणी करू शकतात. नोंदणीनंतरइ-बाजारसाठी शेतकरी त्याच्या उत्पादना विषयी सविस्तर माहिती, उत्पादनाची वितरण पध्दती व पेमेंटचा तपशिलपोर्टलवरनोंदवु शकतात.

शेतकरी गट नोंदणी

गट प्रमुख त्यांच्या संपूर्णशेतकरी गटाची नोंदणी पोर्टलवर गटाचा नोंदणी क्रमांक वापरून करु शकतात. नोंदणीनंतर, गट प्रमुख त्यांची स्वत:ची उत्पादने किंवा गटातील इतर शेतकऱ्यांची उत्पादने पोर्टलवर नोंदवु शकतात.

निविष्ठा पुरवठादारांची नोंदणी

निविष्ठा पुरवठादारांची नोंदणी

बोली

ई-बाजारच्या नियमित खरेदी व्यतिरिक्त, विक्रेत्याद्वारा उपलब्ध उत्पादने खरेदीदार फॉरवर्ड लिलाव, प्राईस-क्वांटिटी, बुक बिल्डिंग व रिव्हर्स लिलाव प्रक्रियेद्वारे खरेदीदार करू शकतात.

खरेदीदारासाठी मार्गदर्शक सूचना

वैशिष्ट्यपूर्ण खरेदी करताना विविध पर्याय उपलब्ध आहेत, यामध्ये संबंधीत बाबींच्या संपूर्ण माहितीचा समावेश आहे (जसे वर्गवारी, किंमत, वितरण पध्दती, राज्य, जिल्हा आणि प्रमाणिकरण),उपलब्धता, खर्च आणि खरेदी करण्यास प्रवृत्त / उत्सुक करणाऱ्या बाबींची नोंद